परब कुटुंबीयांतर्फे मदत करण्याचे दात्यांना आवाहन
ओटवणे/ प्रतिनिधी :-
सावंतवाडी तालुक्यातील कुणकेरी परबवाडी येथील विठ्ठल उर्फ अशोक नरहरी परब (५५) यांना डबल न्युमोनियासह कोविडची लागण झाली आहे. त्यांच्यावर मुंबईतील पी. व्ही. दोशी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. उपचारासाठी सुमारें तीन लाख रूपये खर्च आहे. परब यांची आर्थिक परिस्थिती गरिबीची असून गेल्या पंधरा दिवसांपासुन आतापर्यंतच्या उपचारासाठी त्यांच्या कडील होते नव्हते ते सर्व संपले आहे. त्यामुळे समाजातील स्वयंसेवी संस्था व दानशूर व्यक्तींनी मदत केल्यास त्यांच्यावर पुढील उपचार होऊ शकतात. त्यासाठी खालील बँक खात्यावर मदत जमा करावी असे आवाहन परब कुटुंबियांनी केले आहे.
खात्याचे नाव: विठ्ठल नरहरी परब
खाते क्रमांक: 700701717129204
आयएफएससी कोड: YESB0CMSNOC किंव्हा गुगल पे नंबर 7507367828