कधी डिझेलअभावी तर कधी नादुरूस्त, प्रवाशांमध्ये संताप, ज्येष्ठ नागरिकांनी घेतली धास्ती
वार्ताहर /सावईवेरे
सावईवेरे केरी-फोंडा मार्गावरील कदंब बसचा बंद पडण्याचा सिलसिला काही केल्या संपण्याचा नाव घेत नाही. काल रविवारी सकाळी अशीच एक कदंबा बस नादुरूस्त झाली. सावईवेऱयाहून फोंडामार्गे प्रवास करताना आपेव्हाळ कुर्टी येथील उतरणीवर कदंब बस अचानक बंद पडली त्यामुळे प्रवाशांची दोन दिवस उलटण्य़ापुर्वी परत एकदा गैरसोय झाली. वारंवार कदंबच्या या कारभारामुळे प्रवाशांनी आता कदंबा बस बेभरवश्याची म्हणत कायमची धास्ती घेतलेली आहे. यावेळी बसमध्ये 12 प्रवाशी होते. रविवारची सुट्टी असल्य़ाने प्रवाशी तसे कमीच होते.
सदर बस सावईवेऱयाहून 7.15 वा. फोंडय़ाला प्रवास करीत असता आपेव्हाळ येथील उतरणीचा प्रवास पार केल्यानंतर नाक्यावर बंद पडली. यापुर्वी शुक्रवारी डिझेलअभावी कदंबा बस बंद पडली होती. त्यानंतर सोशल मिडीयावर हे प्रकरण बरेच व्हाययल झाले होते. यावेळी बसचालक व कंडक्टरने कोणतीही प्रतिक्रिया न देता फक्त बस नेमक्या कोणत्या कारणामुळे बंद पडली हे सांगण्याचे टाळले.
ज्येष्ठ नागरिकांनीही घेतली कदंबची धास्ताr
मात्र वारंवार घडत असलेल्या कदंब बसेसमुळे बसवर चढण्याची भिती वाटत असल्याची प्रतिक्रिया एका ज्येष्ठ नागरिकांनी दिली. कदंब बसवर तिकीटवर सुट देण्यात आलेली आहे खरी मात्र असे प्रकार वारंवार घडल्यास खासगी प्रवाशी बसच बरी असा सुर काही प्रवाशी काढत आहे. कदंब महामंडळाने आपल्या बसचा आढावा घ्यावा,त्य़ाची व्यवस्थित डागडुजी करावी. धुळेर म्हापसा येथे एका कदंबा बसचे टायर बाहेर निघाले होते. सुदैवाने अनर्थ टळला. प्रदुषणविरहीत वीजेवरील कदंबा आणून कदंब महामंडळाला सुगीचे दिवस आणू पाहत असलेल्य़ा सरकारने आधी सामान्य ग्रामिण भागात गरीब जनतेला सेवा देणाऱया कदंब बसेस वारंवार नादुरूस्त होण्याचे लागलेले ग्रहण प्रथम दूर करावे अशी मागणी येथील स्थानिकांनी केली आहे