प्रतिनिधी /बेळगाव
सावगाव-मंडोळी रोडसाठी निधी मंजूर झाला आहे. या रस्त्याचे डांबरीकरण करणे तसेच रुंदीकरण करण्यासाठी निधी मंजूर झाला असताना लष्कर विभागाने मंजुरी दिली नाही. त्यामुळे समस्या निर्माण झाली आहे. याबाबत चर्चा करण्यासाठी लष्कर अधिकाऱयांची तसेच जिल्हाधिकारी आणि खासदार मंगला अंगडी यांची बैठक झाली. यामध्ये विविध विषयांवर चर्चा झाली आहे.
लष्कराच्या हद्दीमधून सावगाव, मंडोळी हा रोड जातो. मात्र हा रोड खराब झाला असून तो रोड करण्यासाठी निधी मंजूर झाला आहे. लष्कराचे अधिकारी याबाबत विरोध करत होते.
त्यामुळे जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ, खासदार मंगला अंगडी यांनी लष्कर अधिकाऱयांना बोलावून घेऊन बैठक घेतली. यामध्ये रस्त्याबाबत चर्चा करण्यात आली. लष्कर विभागाने तातडीने रस्ता करण्यास मंजुरी द्यावी, अशी विनंती करण्यात आली आहे.