आणखी 17 पॉझिटिव्ह, 23 जणांना डिस्चार्ज : जिह्यात एकूण 4 हजार 551 जण कोरोनामुक्त : सक्रिय रुग्णांची संख्या 323
प्रतिनिधी / सिंधुदुर्गनगरी:
जिह्यात रविवारी आणखी 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या पाच हजारावर गेली आहे. तर बरे झालेले 23 रुग्ण रविवारी घरी परतले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिली.
जिह्यात शनिवारी एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळला नव्हता. त्यामुळे दिलासा मिळाला होता. मात्र, रविवारी पुन्हा 17 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. त्यामुळे कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या 5 हजार 1 झाली आहे. तसेच बरे झालेल्या 23 रुग्णांना डिस्चार्ज दिला गेल्याने आतापर्यंत एकूण 4 हजार 551 कोरोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. 127 जणांचा आतापर्यंत मृत्यू झाला असून सद्यस्थितीत जिह्यात 323 सक्रिय रुग्णांवर उपचार सुरू आहेत, अशी माहिती देण्यात आली.
सिंधुदुर्ग जिह्यातील सद्यस्थिती
1.आजचे नवीन पॉझिटिव्ह रुग्ण 17
2. सद्यस्थितीतील सक्रिय रुग्ण 323
3. आजअखेर बरे झालेले रुग्ण 4,551
4.आजअखेर मृत झालेले रुग्ण 127
5.आजपर्यंतचे एकूण पॉझिटिव्ह रुग्ण 5,001
6.पॉझिटिव्हपैकी चिंताजनक रुग्ण 6
आतापर्यंतचे तालुकानिहाय पॉझिटिव्ह रुग्ण
1) देवगड तालुका – 334,
2) दोडामार्ग तालुका – 253,
3) कणकवली तालुका – 1569,
4) कुडाळ तालुका – 1136,
5) मालवण तालुका – 423,
6) सावंतवाडी तालुका – 663,
7) वैभववाडी तालुका – 143,
8) वेंगुर्ले तालुका – 467,
9) जिह्याबाहेरील रुग्ण – 13
तालुकानिहाय सक्रिय रुग्ण
1) देवगड – 30 2) दोडामार्ग – 29, 3) कणकवली – 80, 4) कुडाळ – 48, 5) मालवण – 28. 6) सावंतवाडी – 43, 7) वैभववाडी – 7, 8) वेंगुर्ले – 58,
तालुकानिहाय आजपर्यंतचे मृत्यू
1) देवगड तालुका – 8,
2) दोडामार्ग तालुका – 2,
3) कणकवली तालुका – 29,
4) कुडाळ तालुका – 25,
5) मालवण तालुका – 14,
6) सावंतवाडी तालुका – 31,
7) वैभववाडी तालुका – 7,
8) वेंगुर्ले तालुका – 10
9) जिह्याबाहेरील रुग्ण -1
आतापर्यंतचे कोरोना तपासणी अहवाल- आर.टी.पी.सी.आर. टेस्ट
तपासलेले नमुने आजचे 54
एकूण 20,373
पैकी पॉझिटिव्ह आलेले नमुने 3581
ऍन्टिजन टेस्ट तपासलेले नमुने
आजचे 115
एकूण 14,816
पैकी पॉझिटीव्ह आलेले नमुने 1542
पॉझिटिव्ह रुग्णांपैकी अतिदक्षता विभागात असलेले – 6
ऑक्सिजनवर असणारे – 4, व्हेंटिलेटरवर असणारे – 2