सावंतवाडी/प्रतिनिधी-
सिंधुदुर्ग बागायतदार प्रोड्युसर कंपनीच्या कार्यालयाचे उदघाटन मंगळवारी बांदा येथे झाले. जेष्ठ शेतकरी घनश्याम नाईक यांच्याहस्ते झाले. यावेळी माजी जिल्हा बॅक अध्यक्ष सतीश सावंत, भगिरथ प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रसाद देवधर, स्नेहसिंधुचे संदीप राणे, कंपनीचे अध्यक्ष विलास सावंत, जि. प. सदस्या श्वेता कोरगावकर, पंचायत समिती उपसभापती शितल राउळ, संचालक प्रकाश वालावलकर, चंद्रशेखर देसाई, दिवाकर मावळणकर, सुरेश गावडे, बांदा सरपंच अक्रम खान, प्रमोद गावडे, प्रमोद सावंत उपस्थीत होते. संचालकांनी कंपनी शेतकरयांचे हीत डोळ्यासमाेर ठेवुन चालवावी. काजु बीला योग्य भाव मिळत नव्हता. त्यामुळे ही कंपनी अस्तीत्वात आली. काजु बरोबर ईतर पिकावरही लक्ष केंद्रीत करुन ही कंपनी राज्यात आदर्शवत होईल याकडे पहावे. जिल्हा बॅक अध्यक्ष मी असल्याने कदाचित आले नसतील. परंतु यात राजकारण आणता कामा नये. जिल्हा बॅक शेतकरयांची आहे. असे सावंत म्हणाले.