भाजपाकडून काँग्रेसच्या पूनम कोळींना संधी, महाआघाडीची भुमिका अस्पष्ट
प्रतिनिधी / मिरज
मिरज पंचायत समितीच्या सभापती पदासाठी पुन्हा 25 फेब्रुवारीला राजकीय घमासान होणार आहे. सत्ताधारी भाजपाने काँग्रेस सदस्या सौ. पूनम कोळी यांचे नांव सभापती पदासाठी निश्चित केले आहे. महाआघाडीची भुमिका मात्र अद्याप गुलदस्त्यात आहे. सौ. सुमन भंडारे यांनी 20 दिवसातच राजीनामा दिल्याने ही निवडणूक होऊ घातली आहे. मुदतीत पंचायत समिती बरखास्त झाल्यास नूतन सभापती या सर्वाधिक कमी काळाच्या ठरणार आहेत.