सिंधुदुर्गनगरी / प्रतिनिधी-
अनेक महिन्याच्या प्रतीक्षेनंतर सिंधुदुर्ग जिल्हा शासकीय मेडिकल कॉलेजला राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाने तत्त्वतः मंजुरी दिली आहे मात्र अद्याप एमबीबीएस अभ्यासक्रम प्रवेशासाठी मंजुरी मिळालेली नाही त्रुटींची पूर्तता झाल्यावर मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी मिळणार आहे त्यामुळे आता लवकरच मेडिकल कॉलेजला अंतिम मंजुरी मिळून एमबीबीएससाठो प्रवेश मिळण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत