कोरोना संकटामुळे सुविधा : विविध योजनांसाठी उपयुक्त
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) लवकरच एक डिजिटल प्लॅटफॉर्म सादर करणार आहे. सदर प्लॅटफॉर्मच्या आधारे सिडबी आपल्या भागीदारांना लहान आणि मध्यम एन्टप्राईजेस इकोसिस्टम आणि या क्षेत्रातील कोरोनाच्या संदर्भातील माहिती देणार आहे. सदर प्लॅटफॉर्मचे नाव इंडिया एसएमई सर्व्हिसेस प्लॅटफॉर्म असे देण्यात येणार असल्याचे सिडबीकडून दिलेल्या माहितीमधून समजते.
या सुविधेमधून अति लहान, लहान एन्टरप्राईजेससाठी कार्यवाही सुरु करण्यात येणार आहे. आर्थिक सहाय्यता प्राप्त करण्यासाठी पेडिट वाढविण्यासह अन्य सेवाही उपलब्ध होणार आहेत. यासोबत सरकारला या क्षेत्राशी संबंधीत असणाऱया योजना आणि कार्यक्रम यांच्यावरही लक्ष ठेवता येणार आहे. तसेच रेग्युलेटरही या प्लॅटफॉर्मच्या आधारे टेड्स, तक्रारी, जोखीम व अन्य नियोजनात्मक गोष्टींवर नजर ठेवण्यासाठी या डिजिटल मार्गाचा वापर करणार आहे.
सर्व योजनांची माहिती
या सुविधेचा वापर करुन सर्व प्रकारच्या एमएसएमई आणि भागीदारांची माहिती उपलब्ध होणार असल्याचे सिडबीचे अध्यक्ष मोहम्मद मुस्तफा यांनी म्हटले आहे. या क्षेत्रासाठी या प्रकारचा प्लॅटफॉर्म हा एकमेव प्लॅटफॉर्म असल्याचे सिडबीच्या अध्यक्षानी म्हटले आहे. याचा फायदा अनेकांना होण्याची शक्यता आहे.