साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धा
क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
साईराज स्पोर्ट्स क्लब आयोजित साईराज चषक वॉर्डनिहाय क्रिकेट स्पर्धेत मंगळवारी खेळविण्यात आलेल्या सामन्यात अनगोळ स्ट्रायकर संघाने काव्या स्पोर्ट्सचा, नरवीर स्पोर्ट्सने श्री साई स्पोर्ट्सचा तर सिद्धकला अनगोळने किकेट मास्टरचा पराभव केला. अनगोळ स्ट्रायकर-गोल्डन स्पोर्ट्स यांचा सामना टाय झाल्याने सुपर ओव्हर उद्या खेळविण्यात येणार आहे. तीन संघांनी विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश मिळविला. प्रमोद पालेकर, जावेद धामणेकर, विशाल धनगोळी यांना सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
व्हॅक्सिन डेपो मैदानावर खेळविण्यात आलेल्या पहिल्या सामन्यात काव्या स्पोर्ट्सने प्रथम फलंदाजी करताना 10 षटकात 5 बाद 63 धावा केल्या. त्यात भावेशने 37 धावा केल्या. अनगोळ स्ट्रायकरतर्फे वसंत, अनंत, रामनाथ व जावेद यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला. त्याला उत्तर देताना अनगोळ स्ट्रायकर्सने 6.4 षटकात 4 बाद 67 धावा करून सामना 6 गडय़ांनी जिंकला. त्यात जावेद धामणेकरने 29, साहील देसाईने 17 धावा केल्या. काव्यातर्फे अजिमने 4 गडी बाद केले.
दुसऱया सामन्यात नरवीर स्पोर्ट्सने 10 षटकात 4 गडी बाद 125 धावा केल्या. विशाल धनगोळीने 9 षटकार 4 चौकारासह 80, सचिनने 19, अमोलने 14 धावा केल्या. श्री साई स्पोर्ट्सतर्फे आनंदने 3 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना श्री साई स्पोर्ट्स संघाने 10 षटकात 4 बाद 101 धावाच केल्या. त्यात युवराजने 42, अभयने 34 धावा केल्या. नरवीरतर्फे अमोलने 3 गडी बाद केले.
तिसऱया सामन्यात सिद्धकला संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 3 बाद 92 धावा केल्या. त्यात संतोष जाधवने 39, प्रमोद पालेकरने 28 धावा केल्या. मास्टरतर्फे इम्रानने 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना मास्टर संघाने 8 षटकात 8 बाद 78 धावा केल्या. त्यात सोमेशने 44 धावा केल्या. सिद्दकलातर्फे प्रमोद पालेकर व साहिल यांनी प्रत्येकी 3 गडी बाद केले.
चौथ्या सामन्यात अनगोळ स्ट्रायकर संघाने प्रथम फलंदाजी करताना 8 षटकात 5 बाद 82 धावा केल्या. त्यात जावेदने 12, रामनाथ काळेने 14, अवधुतने 15 धावा केल्या तर गोल्डन स्पोर्ट्सतर्फे वासीम डी व नाजीम यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. त्याला उत्तर देताना गोल्डन स्पोर्ट्सने 8 षटकात 6 बाद 82 धावा केल्याने सामना टाय झाला. त्यात परवेझने 35, हानी ने 25 धावा केल्या. अनगोळतर्फे वसंतने 2 गडी बाद केले. सामना टाय झाला. अंधुक प्रकाशामुळे या दोघातील सुपर ओव्हरचा सामना सकाळी 9 वा. खेळविण्यात येणार आहे.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे बी. वाय पाटील, विनायक धामणेकर, तुषार ताशिलदार व अमर नाईक यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
दुसऱया सामन्यात प्रमुख पाहुणे तुषार ताशिलदार, राकेश कांबळे, पवन कांबळे, व सागर भोसले यांच्या हस्ते विशाल धनगोळी याला सामनावीर पुरस्कार देण्यात आला.
बुधवारचे सामने
- शहापूर स्पोर्ट्स वि. विराट सकाळी 9 वाजता.
- सीटीएम वि. एपीएस वॉरियर्स सकाळी 10.30 वाजता.
- साईराज वि. पहिल्या सामन्यातील विजेता 12 वाजता.
- विराट स्पोर्ट्स वि. क्रिकेट स्पोर्ट्स दुपारी 2 वाजता.