साळ येथे पार नं. 2 तर्फे आयोजित ’ स्वरसांज’चे सादरीकरण
प्रतिनिधी /पणजी
साळ येथील श्री महादेव भूमका देवस्थानच्या वार्षिक भजनी सप्ताह निमित्त पार नंबर 2 तर्फे आयोजित केलेल्या कुडाळ महाराष्ट्र येथील संयोजक आदित्य वालावलकर निर्मित स्वरसांज हा संगीताच्या कार्यक्रमात श्रोते मंत्रमुग्ध झाले. सादर केलेल्या प्रत्येक गीताला श्रोत्यांची दाद मिळत गेली आणि गायकांनी वाद्यवृदांच्या साथीने नवा साज चढविला.
गेल्या वषी कोरोनाच्या महामारीत संगीत बैठकीस खंड पडल्याने ,यावषी सरकारने दिलेल्या शिथीलतेमुळे नव्या जोमाने संगीत बैठकीचे आयोजन केले. या संगीत बैठकीत प्रसिद्ध गायिका सिद्धी शेलार यांनी आपल्या सुमधुर आवाजात ” रूप पाहता लोचनी ” विठ्ठल भक्ती अभंगाने कार्यक्रमाची सुरुवात केली त्यानंतर ” सुखाचे हे सुख चंद्रभागे तटी’ हा संत चोखामेळा चा अभंग ,आम्हा न कळे ज्ञान न कळे पुराण, ’अभिर गुलाल उधळीत रंग ’संत एकनाथ अभंग,” तार वाजे काळजाची ,ओवी सूचे ज्ञानेशाची ” अभंग असे एकापेक्षा एक सुरेख अभंग सादर करीत, ” कटय़ार काळजात घुसली” या नाटकातील घेई छंद मकरंद हे नाटय़गीत सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
तर गायक प्रसन्न प्रभू तेंडोलकर यांनी ” पंढरीचा वास चंद्रभागे स्नान, आणिक दर्शन विठोबाचे ” या अभंगाने सुरूवात करून श्रोत्यांची दाद मिळविली. तद्न?तर” काळ देहासी आला खाऊ “, काटा रुते कुणाला, या जन्मावर या जगण्यावर , शतदा प्रेम करावे हे सुधीर बापूचे भावगीत सादर केले.हरी म्हणा कुणी, गोविंद म्हणा कुणी,हरी नारायणा” ही गवळण सादर केल्यानंतर ” स्वामी कृपा कधी करणार” हया भक्तीगीत वजा भैरवीने संगीत मैफिलीची सांगता केली. या संगीतमय मैफिलीस तेवढय़ाच ताकतीचे संगीत वादक कलाकाराची साथ लाभली .यात हार्मोनियम – बाळकृष्ण नाईक,कुडाळ ( झी मराठी- सारेगमप ),कीबोर्ड- दिनेश वालावलकर ,कुडाळ ; ऑक्टोपॅड -अश्विन जगदीश जाधव, कुडाळ, पखवाज – आदित्य वालावलकर ( संयोजक -कुडाळ ), तबला- सिद्धेश कुंटे (कुडाळ )या मातब्बर कलाकारांनी साथ केली तर शिरोडकर साउंड सर्विस – बांदा चे मालक सुभाष शिरोडकर यांनी उत्तम असे ध्वनी संयोजन करून श्रोत्यांच्या पसंतीस उतरले ,त्यांना सचिन शिरोडकर व समीर शिरोडकर यांची साथ लाभली तर कार्यक्रमाची शोभा वाढवणारा असा धीरज नाईक व साथी , तुये, पेडणे-गोवा यांनी उत्तम मंडप सजावट केली होती .एकंदर स्वरसांज कार्यक्रमाच्या उत्तम व बहारदार असे सादरीकरणाने कार्यक्रमाची सांगता केव्हा झाली हे कळलेच नाही. तद्न?तर सजविलेला चित्ररथ दि?डी मिरवणूकीने श्री भूमका मंदिराच्या प्रांगणात आणला, या दि?डीत वयोवृद्ध, युवा व बालक स्त्री पुरुष सामिल झाले होते.. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी पार नं. 2 मधील परब, राऊत, देसाई, राऊळ, नाईक साळगांवकर, शेणई, घाडी, भाईप, चिनरकर, येरम, घोगळे ,बायकर, शेटये, नाईक, कामत, परवार आदी कुटुंबियांनी व हितचिंतकांनी श्रम घेतले.