सिद्धार्थ शुक्ला आणि शहनाज गिल ही टेलिव्हिजन विश्वातील सर्वात लोकप्रिय जोडी. हे दोघे बिग बॉस सिझन 13 मध्ये एकत्र दिसले होते. सिध्दार्थचं 2 सप्टेंबर रोजी निधन झालं. त्याच्या अशा अचानक जाण्याने संपूर्ण टेलिव्हिजनसृष्टीसह चाहत्यांनीही मोठा धक्का बसला. तर सिद्धार्थच्या निधनाने शहनाज पूर्णपणे खचली होती. सिद्धार्थच्या आठवणीत शहनाजचं ‘तू यहीं है’ हे गाणं नुकतंच प्रदर्शित झालं असून तिने हे गाणं सिद्धार्थला सर्मपित केलं आहे. या गाण्याद्वारे शहनाजने तिच्या भावना व्यक्त करण्याचा प्रयत्न केला आहे. सिद्धार्थने जग सोडले असलं तरी तो अजूनही तिच्या हृदयात, तिच्या आठवणींमध्ये जिवंत आहे. गाण्याची सुरुवात शहनाजच्या प्रसिद्ध डायलॉगने होते, ‘तू फक्त माझा आहेस, मी खेळ जिंकण्यासाठी नाही, मी तुला जिंकण्यासाठी आले आहे, असा हा डायलॉग आहे. या गाण्यात बिग बॉसच्या घरातील ‘सिदनाझ’चे सर्व सुंदर आणि मोहक क्षण, त्यांच नातं, त्यांची भांडणं, त्यांचा वेडेपणा असे प्रत्येक क्षण शक्य तितक्या चांगल्या प्रकारे दाखवण्याचा प्रयत्न केला आहे. बिग बॉसच्या घरात या दोघांच्या जोडीला खूप पसंती मिळाली होती. सिद्धार्थ हा बिग बॉस सिझन 13 चा विजेता ठरला होता. एकता कपूरच्या ‘ब्रोकन बट ब्युटीफूल 2’ या सीरिजमधील त्याचं काम चाहत्यांना फार आवडलं होतं.
Previous Articleजिल्हय़ात अतिवृष्टीचा इशारा
Next Article अमेरिकेच्या ब्रुकलिनमध्ये बॉटल बॉम्बचा हल्ला
Tarun Bharat Portal
Parasharam Patil is a versatile content writer, scriptwriter, and content producer at Tarun Bharat Media. Specializes in editorial news, local news entertainment, and political content. His captivating storytelling and deep industry knowledge make him an expert in crafting engaging narratives.