पॅरा जलतरण स्पर्धा
बेळगाव : बेंगळूर येथे राष्ट्रीय दिव्यांग पॅरा जलतरण स्पर्धेत लिंगराज महाविद्यालयाचे जलतरणपटू सिमरन गुंडकलने 3 सुवर्णपदके व साहिल जाधवने एक रौप्य, एक कांस्य पदक मिळवित घवघवीत यश संपादन केले. त्यांचा माजी खासदार प्रभाकर कोरे यांच्याहस्ते गौरव करण्यात आला.
बेंगळूर येथे झालेल्या या राष्ट्रीय पॅरा जलतरण स्पर्धेत सिमरन गुंडकलने 50 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. फ्रीस्टाईल, 100 मी. बॅकस्ट्रोक या प्रकारात सुवर्णपदके मिळविली. साहील जाधवने पुरुषांच्या 100 मी. बटरफ्लायमध्ये रौप्य व 200 मी. मिडलेमध्ये कांस्यपदक पटकाविले. त्यांच्या या कामगिरीमुळे केएलई संस्थेचे चेअरमन माजी खासदार प्रभाकर कोरे, बी. आर. पाटील, अशोकअण्णा बागेवाडी, जलतरण प्रशिक्षक उमेश कलघटगी, लिंगराज महाविद्यालयाचे क्रीडा निर्देशक डॉ. सी. रामराव यांच्या उपस्थितीत सिमरन व साहिल यांचा खास गौरव करून शुभेच्छा दिल्या. यावेळी लिंगराज महाविद्यालयाचे प्राध्यापक व पालक उपस्थित होते.