प्रतिनिधी/ बेळगाव
सिमेंट कंपन्या सिमेंटचे दर अचानक वाढवत आहेत. काही वेळा कमी करत आहेत. त्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा संभ्रम निर्माण होत आहे. विक्री कशी करायची? हाच प्रश्न आम्हाला पडला असून दरात वारंवार होणारी तफावत थांबवावी आणि एकच स्थिर दर कंपन्यांनी विपेत्यांना द्यावा, अशी मागणी बेळगाव जिल्हा सिमेंट डिलर असोसिएशनच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून करण्यात आली.
सिमेंटचे दर जाहीर करताना कंपन्या विपेत्यांना वेठीस धरत आहेत. असाच प्रकार होत राहिल्यास व्यवसाय करणे कठीण जाणार आहे. दर स्थिर केले नाहीत तर सोमवार दि. 28 पासून विक्री बंद करण्याचा इशारा देण्यात आला. बुधवार दि. 23 रोजी एक दिवस आम्ही बंद करून त्याचा निषेध नोंदविणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले. सिमेंट विपेत्यांना अचानकपणे या दराने विक्री करा, असे सांगण्यात येत आहे. त्यामुळे ग्राहकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.
घर बांधणाऱया सर्वसामान्य जनतेला, कंत्राटदार, गवंडी, सेंट्रिंग तसेच इतर कामगारांना त्याचा फटका बसत आहे. महत्त्वाचे म्हणजे सिमेंट खरेदी केल्यानंतर अचानक त्याचा दर कमी केला जातो. याचबरोबर कमी दराने सिमेंट विक्री करा, असे कंपन्यांकडून सांगण्यात येते. त्यामुळे आम्हाला त्या दराप्रमाणे सिमेंट विक्री करावी लागते. मात्र आम्ही कंपनीला अधिक रक्कम भरलेली असते. ती रक्कम बरेच महिने त्यांच्याकडे पडून राहते. महिन्याला जवळपास 12 कोटीहून अधिक रुपये कंपनीकडे राहत आहेत. त्यामुळे कंपन्यांना विनाकष्ट भांडवल मिळत आहे. मात्र यात सिमेंट विपेते भरडले जात आहेत.
तेव्हा सिमेंटचे दर कमी झाल्यानंतर उर्वरित रक्कम तातडीने सिमेंट विपेत्यांना द्यावी, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली. 390 रुपयेप्रमाणे खरेदी केली व 340 रुपयांना विक्री झाली तर प्रत्येक सिमेंट पिशवीचे 50 रुपये कंपनीकडे राहत आहेत. अशा प्रकारे सिमेंट कंपन्या सिमेंट विपेत्यांची दिशाभूल करत आहेत. तेव्हा त्यांना योग्य ती सूचना करावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली.
आता आम्ही निवेदन दिले आहे. मात्र या मागण्या मान्य झाल्या नाहीत तर सोमवारपासून बेमुदत आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे. जिल्हाधिकारी एम. जी. हिरेमठ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी संघटनेचे अध्यक्ष इराप्पा जी. दयाण्णावर, सेपेटरी संजय बेळगावकर, खजिनदार भाऊसाहेब पोनजी, देवेंद्र देसाई, रवी पाटील, महेश सारडा, परशुराम गडदार, सिद्राय माने, ऍड. सचिन शिवण्णावर, श्रीधर नागोजीचे, नारायण घसारी, सोमशेखर चोण्णद, सी. बी. हुंदलकट्टी, नितीन जाधव यांच्यासह सिमेंट विपेते उपस्थित होते.