मालकाचा शोध घेण्याची नागरिकांची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
सिव्हिल हॉस्पिटलच्या इमारतीसमोर फुटपाथवर गेल्या काही महिन्यांपासून एक बेवारस स्कुटी पडून आहे. ही स्कुटी कोणाची? या परिसरात ती कोणी सोडून दिली? याचा उलगडा झाला नाही.
चन्नम्मा सर्कलपासून एपीएमसीकडे जाणाऱया मार्गावर सिव्हिल हॉस्पिटलचा वैद्यकीय विभाग आहे. या इमारतीसमोर एक लहान चहाची टपरी आहे. टपरीजवळ फुटपाथवर केए 22 क्य़ु 1129 क्रमांकाची स्कुटी गेल्या 8 ते 9 महिन्यांपासून पडून आहे. ही स्कुटी कोणाची? याचा शोध घेण्याची गरज आहे. फुटपाथवर पडूनही या वाहनाकडे कोणाचे फारसे लक्ष गेले नाही. एपीएमसी पोलिसांनी या वाहनाचे मालक कोण? याचा शोध घ्यावा, अशी मागणी केली जात आहे.