550 अहवाल निगेटिव्ह तर आणखी 9 जण पॉझिटिव्ह, दुसऱया इमारतीतही रुग्णांची भरती
प्रतिनिधी / बेळगाव
कोरोना रुग्णांनी सिव्हिल हॉस्पिटल तुडुंब भरु लागले आहे. गुरूवारी सायंकाळी सिव्हिलमध्ये 103 हून अधिक कोरोनाबाधित होते. जागेअभावी अन्य इमारतीतही रुग्णांची भरती करण्यात येत असून गुरुवारी 550 अहवाल निगेटिव्ह तर 9 अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
जिल्हा प्रशासनाला आणखी 1907 अहवालांची प्रतिक्षा आहे. गुरुवारी सायंकाळी उपलब्ध झालेल्या अहवालानुसार वंटमुरी येथील 2, पिरनवाडी येथील 1, शिरगुप्पी, ऐणापूर, हुलगबाळी येथील प्रत्येक 1, अथणी येथील 2 व जमखंडी (जि. बागलकोट) येथील एका युवकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
या सर्व 9 जणांना सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. एकूण बाधितांची संख्या 444 वर पोहोचली आहे. तर बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांनी दिलेल्या माहितीनुसार कोरोनामुक्त झालेल्या सहा जणांना घरी पाठविण्यात आले आहे. आतापर्यंत 342 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
अथणी तालुक्मयात कोरोनाचा फैलाव वाढताच आहे. राजकीय व सामाजिक क्षेत्रातील काही नेत्यांनाही कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यांच्यावर खासगी इस्पितळात उपचार करण्यात येत आहेत. दरम्यान अथणी येथील एका 60 वषीय महिलेचा गुरुवारी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू झाला आहे. मात्र हा मृत्यू कोरोनामुळे झाला नसल्याचे बिम्स्च्या अधिकाऱयांनी सांगितले.
अथणी तालुक्मयातील ऐणापूर, कोहळ्ळी, बाडगी, संबरगी, रायबाग तालुक्मयातील हारुगेरी, गोकाक तालुक्मयातील सिंध्दीकुरबेट, दुरदुंडी आदी गावातही कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मात्र गुरुवारच्या अहवालात याचा उल्लेख केला नाही. राज्य आरोग्य विभागाच्या हेल्थ बुटेलीनमध्ये गुरुवारी बेळगावातील 9 जणांना कोरोनाची लागण झाल्याचा उल्लेख करण्यात आला आहे.
सिव्हिल हॉस्पिटलमध्ये कोरोना रुग्णांसाठी जागा अपुरी पडणार याची सर्व लक्षणे दिसून येत आहेत. सध्या कोरोना बाधितांवर डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील वैद्यकीय विभाग इमारतीत उपचार करण्यात येत आहेत. गुरुवारी या इमारतीत गर्दी झाल्यामुळे क्लब रोडवरील सर्जिकल ब्लॉकमध्येही पाच रुग्ण हलविण्यात आले आहेत. या बरोबरच ओपीडी विभागावर नव्याने बांधण्यात आलेल्या इमारतीत 50 बेड तयार ठेवण्यात आले आहेत.
सर्जिकल ब्लॉक शेजारीच आपत्कालीन विभाग आहे. त्यामुळे या इमारतीत कोरोना बाधितांना हलविल्यामुळे वैद्यकीय कर्मचारी हादरले आहेत. एकीकडे झपाटय़ाने कोरोनाचा फैलाव वाढत चालला आहे. अशा परिस्थितीत सर्वसामान्य रुग्णांसाठी काही विभाग सुरक्षित ठेवायला हवे होते. मात्र सिव्हिल हॉस्पिटलमधील सर्जिकल ब्लॉकमध्येही कोरोना बाधितांना हलविल्याने एकच खळबळ माजली आहे.
यासंबंधी बिम्स्चे वैद्यकीय संचालक डॉ. विनय दास्तीकोप यांच्याशी संपर्क साधला असता वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन सर्जिकल ब्लॉकमध्ये कोरोना बाधितांना हलविण्यात आले आहे. नव्या इमारतीतही 50 बेड तयार ठेवण्यात आले आहेत. कोरोना बाधितांना उपचार मिळावे यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे, असे त्यांनी सांगितले.