नवीन नियुक्तीची प्रक्रिया सरकारकडून सुरू
नवी दिल्ली / वृत्तसंस्था
सरकारने जनरल बिपिन रावत यांच्या जागी देशाचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ (सीडीएस) नियुक्त करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. सध्याच्या तीन दलांच्या प्रमुखांमधूनच जनरल रावत यांचा उत्तराधिकारी निवडला जाण्याची दाट शक्मयता आहे. यातील लष्करप्रमुख जनरल एम. एम. नरवणे हे तिघांपैकी ज्ये÷ आहेत. नरवणे यांनी 31 डिसेंबर 2019 रोजी लष्करप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला असून येत्या एप्रिलमध्ये म्हणजे पाच महिन्यांनी ते निवृत्त होणार आहेत. हवाई दलाचे प्रमुख एअर चीफ मार्शल व्ही. आर. चौधरी हे 30 सप्टेंबर रोजी आणि ऍडमिरल आर. हरिकुमार यांनी 30 नोव्हेंबर रोजी नौदल प्रमुख म्हणून पदभार स्वीकारला आहे. अशा परिस्थितीत सीमेवर सध्याचा अनुभव आणि आव्हाने पाहता जनरल नरवणे हे पुढील सीडीएसच्या शर्यतीतील सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहेत. जनरल नरवणे यांनी पूर्व लडाखमध्ये चीनसोबतच्या लष्करी संघर्षाचा प्रदीर्घ आणि आव्हानात्मक काळही समर्थपणे पेलला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, संरक्षण मंत्रालयाने महत्वाच्या व्यक्तींशी सल्लामसलत करून शुक्रवारी या दिशेने अनिवार्य कागदपत्रे तपासण्यास सुरुवात केली आहे. या निवडीसाठी संभाव्य उमेदवारांचे पॅनेल तयार झाल्यानंतर पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळाची समिती नवीन सीडीएसच्या निवडीवर अंतिम निर्णय घेईल असे समजते.
नवीन ‘सीडीएस’ची तिन्ही दलांच्या प्रमुखांमधून निवड केली जाईल की नुकतेच निवृत्त झालेल्या लष्करप्रमुखांना जनरल रावत यांचा उत्तराधिकारी बनवले जाईल हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. परंतु सरकारने ज्याप्रकारे तिन्ही सेवांमधील सखोल समन्वयासाठी सीडीएस अंतर्गत लष्करी कामकाजाचा स्वतंत्र विभाग निर्माण केला आहे, ते पाहता ही जबाबदारी निवृत्त लष्करप्रमुखांना देण्याची शक्मयता कमीच वाटते.