प्रतिनिधी/ सातारा
शाहूपुरी गुन्हे प्रकटीकरण शाखेकडून चोरीचा प्रयत्न करणाऱया सराई चोरटय़ाला अटक केली आहे. विलास उर्फ यल्ल्या अनिल कोळी (वय 20, रा. आकाशवाणी झोपडपट्टी) असे अटक केलेल्या चोरटय़ाचे नाव आहे. यापूर्वी ही संशयित विलास कोळी वर मोबाईल व पर्स जबरीने चोरून नेण्याचा प्रयत्न करणारे गुन्हे शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल आहे.
याबाबत पोलीसांनी दिलेली अधिक माहिती अशी, शाहूपुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत चोरीच्या गुह्यात वाढ झाली. यामुळे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग मध्ये वाढ करण्याच्या सुचना पोलीस निरीक्षक संजय पतंगे यांनी गुन्हे प्रकटीकरण शाखेला दिल्या. यानुसार शाखेचे पोलीस उपनिरीक्षक नानासाहेब कदम, पोलीस हवालदार हसन तडवी, लैलेश फडतरे, अमित माने, पोलीस नाईक, ओंकार यादव, पोलीस कॉन्टेबल सचिन पवार, स्वप्निल सावंत, धीरज भोसले असे पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करत होते. यावेळी पोउपनि कदम यांना आकाशवाणी झोपडपट्टीमध्ये राहत असलेला रेकॉर्डवरील संशयिताने तीन दिवसापूर्वी आकाशवाणी केंद्रामध्ये चोरी केलेली आहे. तो बुधवारनाका येथील पाण्याच्या टाकीजवळ आला आहे. यावेळी पोउपनि कदम हे आपल्या पोलीस स्टाफसह या ठिकाणी गेले. तेव्हा हा संशयित विलास उर्फ यल्ल्या अनिल कोळी हा दिसून आला. पोलीसांना पाहून तो पळून जावू लागल्याने त्याचा पाठलाग करून त्याला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुह्याबाबत विचारपूस केली. तेव्हा त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली. नंतर कौशल्याने चौकशी केली असता त्याने गुह्याची कबुली दिली. या गुह्याचा पुढील तपास पोलीस हवालदार भाकरे करत आहेत.