प्रतिनिधी / बेंगळूर
वादग्रस्त अश्लील सीडी प्रकरणाची एसआयटीमार्फत तपास सुरू असतानाच सीडी तयार केल्याचा आरोप असणाऱया नरेश गौडा आणि श्रवण या दोघांनी सोमवारी वकिलांमार्फत अटकपूर्व जामीन मिळविण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. सीडी प्रकरणी बेंगळूरच्या पोलिसांनी तपासाची चक्रे गतीमान केल्यानंतर माजी पत्रकार श्रवण आणि नरेश गौडा यांनी पलायन केले होते. सीडी प्रकरणातील सत्यासत्यता उलगडण्यासाठी या दोघांचा शोध घेण्यासाठी बेंगळूर शहर पोलीस आयुक्तांनी पोलिसांनी विविध पथके नेमली होती. अनेक दिवस प्रयत्न करून देखील नरेश गौडा आणि श्रवण यांनी न्यायालयात वकिलांमार्फत अटकपूर्व जामिनासाठी अर्ज केला आहे. त्यामुळे सीडी प्रकरणाला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे.