ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल उद्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावी परीक्षेच्या तारखा जाहीर करणार आहेत. या परीक्षा लेखी स्वरूपात होणार आहेत. उद्या शिक्षणमंत्री यासंदर्भात अधिक माहिती देणार आहेत.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणारी परिस्थिती लक्षात घेता पुढील वर्षी फेब्रुवारीपर्यंत दहावी आणि बारावी बोर्डाच्या परीक्षा होणार नाहीत, अशी माहिती शिक्षणमंत्री पोखरियाल यांनी यापूर्वीच दिली आहे. बोर्डाच्या परीक्षाबाबत लवकरात लवकर चर्चा केली जाईल आणि परीक्षा फेब्रुवारीनंतरच घेतल्या जातील, असेही ते म्हणाले होते.
सर्वसाधारणपणे बोर्डाच्या प्रॅक्टिकल परीक्षा जानेवारीत सुरू होतात आणि लेखी परीक्षा फेब्रुवारीत घेतल्या जातात. पण यंदा कोरोनामुळे बोर्डाच्या परीक्षा उशिरा होण्याची ही पहिलीच वेळ आहे. शिक्षणमंत्री मार्च आणि एप्रिलमध्ये परीक्षांच्या आयोजनाची घोषणा करणार असल्याचे समजते.