राज्य सरकारचा आदेश
कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त सीमा लाटकर यांची बदली अखेर रद्द करण्यात आली आहे. यासंबंधी राज्य सरकारने आदेश काढला असून त्यामुळे त्या पोलीस उपायुक्त म्हणून बेळगाव येथेच सेवा बजावणार आहेत.
राज्य सरकारने 31 डिसेंबर रोजी कर्नाटकातील आठ आयपीएस अधिकाऱयांच्या बदल्या केल्या होत्या. त्यामध्ये सीमा लाटकर यांचाही समावेश होता. सीमी मरीयम जॉर्ज यांची कायदा व सुव्यवस्था विभागाच्या पोलीस उपायुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.
दुसऱया दिवशी सीमी मरियम जॉर्ज यांचा नियुक्ती अर्ज रद्द करुन चिकोडीचे एएसपी जी. के. मिथुनकुमार यांची नियुक्ती करण्यात आली होती. त्यामुळे अनेक संघटनांनी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. अखेर बदलीचा आदेश रद्द करुन सीमा लाटकर यांना बेळगाव पोलीस उपायुक्तपदी कायम करण्यात आले आहे.