प्रतिनिधी / शिरोळ
येथील दुय्यम निबंधक कार्यालयातील कनिष्ठ लिपिक आणि खासगी उमेदवार लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात सापडले. दिलीप आनंदा लाड वय वर्ष 31 राहणार कागल वाडी कसबा बावडा व खाजगी उमेदवार राजेंद्र सातलिंग कुंभार वय वर्षे 51 राहणार शिरोळ अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. पंधराशे रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडल्याने एकच खळबळ माजली आहे.
याबाबतची सविस्तर माहिती अशी की जयसिंगपूर येथील तक्रारदार यांचे बहिणीने 14 सात 2008 रोजी जयसिंगपूर येथील रि स र्नंबर 10 4 – 5 बिगरशेती प्लॉट नंबर 23 या मिळकतीपैकी 140 63 चौरस मीटरचा प्लॉट खरेदी केला आहे सदर प्लॉट नियंत्रित सत्ता प्रकारातील असून तो खरेदीसाठी शासनाची पूर्वपरवानगी घ्यावी लागते हे तक्रार यांचे बहिणीस माहीत नसल्याने त्यांनी तशी शासनाची पूर्व परवानगी घेतली नव्हती त्यामुळे प्लॉट खरेदी झाले व प्लॉटचे मालकी हक्कात तक्रारदार यांच्या बहिणीचे नाव न लागता अध्याय प्लॉटचे मालकी हक्कात मूळ मालकाचे नाव आहे. त्यामुळे तक्रार यांचे बहिणीने प्लॉट खरेदी व्यवहार नियमित होण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे 31 7 19 रोजी अर्ज केला होता.
सदर तक्रारदार यांच्या बहिणीने प्लॉटचा दुय्यम निबंधक यांच्या कार्यालयाचा चालू सालचा मूल्यांकन दाखला मिळणे बाबतचा अर्ज घेऊन गेल्या असता संबंधित लाड यांना भेटली व त्यांच्या तेव्हा त्यांनी तक्रार यांच्या बहिणीचा आज वाचून सदर प्लॉट खरेदी बेकायदेशीर आहे. त्यामुळे तुम्हाला प्लॉटचा मूल्यांकन दाखला देता येत नाही असे सांगितले.
तक्रारदार यांनी त्यांना मंडळ अधिकारी यांच्याकडे प्लॉट नियमित करण्यासाठी प्लॉटचा मूल्यांकन दाखला हजर करायचा आहे असे सांगितल्यावर त्यांनी मूल्यांकन दाखला देण्यासाठी एक हजार रुपये तिची मागणी केली तरच तुम्हाला मूल्यांकन दाखला मिळेल असे सांगितले.
तक्रारदार यांनी त्यांना काहीतरी कमी करा असे सांगितले होते आणि त्यांचे काहीही ऐकून घेतले नाही तक्रारदार यांनी कोल्हापूर येथील वाचलत लुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती आज या कार्यालय पडताळणी केली असता निष्पन्न झाले आज तीन वाजण्याच्या सुमारास कनिष्ठ लिपिक दिलीप लाड यांच्या वतीने खाजगी उमेदवार राजेंद्र कुंभार यांनी पंधराशे रुपये ची लाख स्वीकारताना रंगेहात पकडले.
या प्रकरणी दिलीप लाड खाजगी उमेदवार राजेंद्र कुंभार यांचे विरोधात शिरोळ पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल केला असून दोघांना अटक करण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राजेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत हवालदार मनोज खोत पोलीस कॉन्स्टेबल रुपेश माने मयुर देसाई यांनी केली ही कारवाई आज दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.
लाचलुचप प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपाधिक्षक आदिनाथ बुधवंत यांनी सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की लाचेच्या अथवा अपसंपदे बाबत तक्रार असल्यास लाचलुचपत प्रतिबंधक विभाग संपर्क साधण्याचे आवाहनही आदिनाथ बुधवंत यांनी केले आहे.