पंढरपूर / प्रतिनिधी
ज्येष्ठ नेते माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांचे सोमवारी निधन झाले. यानंतर परिचारक यांचा अस्थिकलश पंढरपुरात कार्यकर्त्यांच्या दर्शनासाठी वाड्याबाहेर ठेवण्यात आला होता. अस्थि दर्शनासाठी हजारो कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावली.
परिचारकांवर मंगळवारी पुणे येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यानंतर त्यांचा अस्थिकलश पंढरपूर येथे बुधवारी सकाळी आणण्यात आला. परिचारकांच्या प्रदक्षणा मार्गावरील वाड्याबाहेर आपल्या दर्शनासाठी होता. तसेच सुधाकरपंत त्यांचे कार्यक्षेत्र असणाऱ्या पांडुरंग सहकारी कारखानावर देखील अस्थिकलश दर्शनासाठी ठेवण्यात आला. तर तालुक्यातील 8 ठिकाणी ग्रामीण भागात आणि मंगळवेढा या ठिकाणीदेखील अस्थिकलश दर्शनासाठी मोठी गर्दी करण्यात आली.
शेतकऱ्यांचा पांडुरंगा म्हणून परिचारक यांना ओळखले जायचे. त्यांच्यावर प्रेम करणारी जनता मोठी आहे. सुधाकरपंतांचे शेवटचे दर्शन न झाल्याने अस्थिकलशाचे दर्शन वेळीच अनेक कार्यकर्ते शेतकरी यांना अश्रू अनावर झाले होते.
बुधवारी दुपारनंतर परिचारकांच्या अस्थिकलशाचे चंद्रभागेत विसर्जन करण्यात येणार आहे. त्यांच्या अस्थिकलश दर्शनासाठी देखील मोठ्या प्रमाणावर सोशल डिस्टन्सचे पालन करण्यात येत आहे.