प्रतिनिधी /पणजी
परम विशिष्ट सेवा पदकाने गौरवान्वित देशाचे माजी लष्कर प्रमुख, पंजाबचे भूतपूर्व राज्यपाल तसेच गोव्याचे सुपुत्र जनरल सुनित रॉड्रिग्ज (88) यांच्यावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
पर्वरी येथील डिफेन्स कॉलनीतील राहत्या घरी शुक्रवारी दुपारी त्यांचे निधन झाले होते. आपल्यावर हिंदू धार्मिक पद्धतीने अंत्यसंस्कार करण्यात यावे, अशी अंतिम इच्छा त्यांनी व्यक्त केली होती. त्यानुसार आज सोमवार दि. 7 रोजी दुपारी 3.15 वाजता सांतईनेज येथील ’मोक्ष स्मशानभूमीत’ त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
रविवारी दुपारी 3 वाजता स्थानिक लष्करी अधिकाऱयांतर्फे सांतईनेज स्मशानभूमीत अंत्यसंस्काराच्या संपूर्ण व्यवस्थेची तालीम घेण्यात आली. त्यानुसार आज संपूर्ण लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.