सांखळी /प्रतिनिधी
सुर्ल तारीर फेरी धक्मक्याजवळ मांडवी नदीत तरंगत्या अवस्थेत अज्ञात इसमाचा मृतदेह सापडला असून डिचोली पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे.
यासंदर्भात पोलिसांना फेरीबोटीत प्रवास करणाऱया इसमाने माहिती दिली. त्यानंतर पोलीस पथक दाखल झाले व त्यांनी पाण्यातून मृतदेह बाहेर काढला. मात्र त्याची ओळख पटलेली नाही तसेच त्याच्याकडे खिशात कोणताही ओळख पटवणारा कागद सापडलेला नाही, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलीस ठाण्यात सुर्लात एक इसम बेपत्ता असल्याची माहिती मिळाल्याने त्या अनुषंगाने पोलिसांनी त्या परिवाराला आणून मृतदेहाची पाहणी केली मात्र तो नसल्याचे उघड झाले.
इसमाचा मृतदेह दोन दिवस झाले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. त्याची डीएनए तपासण्यात येणार असल्याची माहिती पोलीस सूत्रांनी दिली.
या प्रकरणी डिचोली पोलिसांनी तपासाला गती दिली असून पुढील तपास सुरू आहे.