इंदौर
मालमत्ता व्यवस्थापन कंपनी सॅमको असेट मॅनेजमेन्टने ‘सॅमको फ्लेक्सी कॅप फंड’चा नवा फंड सादर केला आहे. सदरच्या फंडमधून कंपनी जवळपास 5,000 ते 6,000 कोटी रुपयापर्यंत गुंतवणुकीचे ध्येय प्राप्त करणार असल्याचे समजते.
सॅमको असेट मॅनेजमेन्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी उमेश कुमार मेहता यांनी म्हटल्याप्रमाणे ‘आम्ही या नवीन फंडच्या आधारे गुंतवणूक करणार असून यातून अधिकचे गुंतवणूक ध्येय साध्य करणार असल्याचे’ सीईओंनी स्पष्ट केले आहे.
सॅमको फ्लेक्सी कॅपचा फंड एनएफओ आगामी 17 जानेवारी रोजी खुला होणार असून प्रभावी पोर्टफोलियोचा व्यवसाय कायम ठेवण्यासाठी 25 सर्वात प्रभावी भारतीय आणि जागतिक कंपन्यांमधील गुंतवणुकीवर ध्येय निश्चित करणार असल्याचे नमूद केले आहे.