मुंबई
हवा आणि गरम वाफेच्या माध्यमातून कपडय़ातील मळ काढणारे एअरडेसर हे नवे उत्पादन सॅमसंगने नुकतेच बाजारात लाँच केले आहे. सदरचे उत्पादन हे कपडय़ावरचा मळ तर काढतेच शिवाय किटाणूंचीही स्वच्छता करून कपडे सॅनिटाइज करते. कपडय़ांची काळजी घेणारे हे उत्पादन असल्याचे सॅमसंगने म्हटले आहे. याची किंमत 1 लाख 10 हजार रुपये इतकी असणार असल्याचे समजते. ग्राहकांना सॅमसंगच्या अधिकृत ऑनलाइन स्टोरसह इ-कॉमर्स पोर्टल ऍमेझॉन व फ्लिपकार्टवर 24 डिसेंबरपासून सदरचे उत्पादन खरेदी करता येणार आहे.