विक्की कौशलसोबत झळकणार सान्या अन् फातिमा
विक्की कौशल अभिनेत्री कॅटरिना कैफसोबत विवाहामुळे सध्या चर्चेत आहे. याचबरोबर ‘सॅम बहादुर’ या चित्रपटावरूनचे त्याचे नाव प्रसिद्धीच्या झोतात आहे. देशाच्या सर्वात महान युद्धनायकांपैकी एक फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्या बायोपिकमध्ये विक्की कौशल मुख्य भूमिका साकारत आहे, आता त्याला पडद्यावरील लीडिंग लेडिज देखील मिळाल्या आहेत. मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनात निर्माण होणाऱया या चित्रपटात दंगल गर्ल्सची एंट्री झाली आहे. चित्रपटात सान्या मल्होत्रा आणि फातिमा शेख झळकणार आहेत.
सान्या होणार ‘सिल्लू माणेकशॉ’
‘सॅम बहादुर’मध्ये विक्की कौशल हा सॅम माणेकशॉ यांची व्यक्तिरेखा साकारणार आहे. तर सान्या मल्होत्रा त्यांची पत्नी ‘सिल्लू’ यांची व्यक्तिरेखा पडद्यावर साकारताना दिसून येईल. माझी पत्नीच माझी सर्वात मोठी शक्ती असल्याचे फील्ड मार्शल माणेकशॉ यांनी अनेकदा म्हटले होते. चित्रपटात फातिमा ही माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसून येणार आहे.
दोघींसोबत काम करण्यास उत्सुक
सान्या आणि फातिमा यांच्यासोबत पहिल्यांदाच काम करण्यासाठी मी अत्यंत उत्सुक आहे. दोघीही पडद्यावर अत्यंत दृढ व्यक्तिमत्त्वं असणाऱया व्यक्तींची भूमिका साकारणार आहेत. ‘माणेकशॉ परिवार’मध्ये दोघींचे स्वागत करतो असे विक्कीने म्हटले आहे.