प्रतिनिधी/ बेळगाव
सेंट्रल हायस्कूलच्या 1978 च्या माजी विद्यार्थ्यांच्यावतीने महाराष्ट्र एकीकरण समितीच्या कोरोना आयसोलेशन सेंटरला जीवनावश्यक वस्तुंची मदत करण्यात आली. कोरोना संसर्गाच्या दुसऱया लाटेचे भयानक स्वरूप पाहता व दिवसेंदिवस रुग्णांची वाढती आकडेवारी लक्षात घेऊन मराठा मंदिर व महाराष्ट्र एकीकरण समितीच्या सदस्यांनी मराठा मंदिरचे रूपांतर एका कोविड विलगीकरण केंद्रात करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून अनेक गरीब रुग्णांवर उपचार करण्यात आले. त्यामुळे या विलगीकरण केंद्राला मदतीचा हात पुढे केला जात आहे.
या संघटनेच्यावतीने तांदूळ, डाळ, आटा, साखर, चहा पावडर, तेल, बिस्कीट हे साहित्य देण्यात आले. संघटनेचे अध्यक्ष नागेश मोरे यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी अविनाश चिंचणेकर, गोविंद दिवेकर, एम. जी. पाटील, सुधीर पाटील, राजू हुबळीकर, संजीव किल्लेकर, आबासाहेब पवार, नंदू मंडोळकर, नागेश शहापूरकर, राजेश हेरेकर, मधुकर, दीपक चिकोर्डे, जगदीश पवार, अनिल शिंदे, शाम पाटील, संजय काळसेकर यांनी देणगी दिली.