जागतिक बाजारातील प्रभाव – सेन्सेक्स 67 अंकांनी प्रभावीत
वृत्तसंस्था/ मुंबई
चालू आठवडय़ातील तिसऱया सत्रात बुधवारी जागतिक बाजारात नकारात्मक वातावरण राहिल्याने आणि देशातील बाजारांमध्ये उच्चांकी पातळीवर नफा वसुली झाल्यामुळे भारतीय भांडवली बाजार दबावासह घसरुन बंद झाला आहे.
प्रारंभीच्या कालावधीत प्राप्त केलेली तेजी गमावत सेन्सेक्स 67 अंकांनी घसरुन बंद झाला आहे. यासोबतच दिवसभरात जवळपास 400 अंकांचा टप्पा प्राप्त केल्याचे पहावयास मिळाले होते. सेन्सेक्समधील कंपन्यांमध्ये विक्रीचा दबाव राहिल्याने दिवसअखेर सेन्सेक्स 66.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 52,482.71 वर बंद झाला आहे. दुसऱया बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 26.95 अंकांनी घसरुन निर्देशांक 15,721.50 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांच्या कामगिरीत पॉवरग्रिडचे समभाग सर्वाधिक म्हणजे एक टक्क्यांपेक्षा अधिकने घसरले आहेत. यासह बजाज फिनसर्व्ह, आयसीआयसीआय बँक, एचडीएफसी, एनटीपीसी, हिंदुस्थान युनिलिव्हर आणि लार्सन ऍण्ड टुब्रो यांचे समभागही घसरणीत राहिले. यांच्या विरुद्ध बाजूला इन्फोसिस, रिलायन्स इंडस्ट्रीज, नेस्ले इंडिया आणि मारुती सुझुकीचे समभाग तेजीत राहिले आहेत.
निवडक क्षेत्रांची कामगिरी
प्रमुख क्षेत्रांपैकी आर्थिक कंपन्यांच्या समभागात विक्री राहिली होती. दिवसभरानंतर अंतिम क्षणी बाजारात नफा वसुलीच्या विक्रीचा दबाव होता. यामध्ये धातू, माहिती तंत्रज्ञान आणि वाहन कंपन्यांच्या समभागात खरेदी राहिली आहे. तसेच औwषध क्षेत्रातील कंपन्यांमध्ये मजबूत स्थिती राहिली होती.
जागतिक बाजारांपैकी आशियातील बाजारात हाँगकाँग आणि टोकीओ हे नुकसानीत राहिले आहेत. तसेच युरोपातील बाजारात काहीशी नुकसानीची स्थिती राहिली होती.