वृत्तसंस्था / लेक्सिंग्टन
डब्ल्यूटीए टूरवरील येथे सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय खुल्या महिलांच्या टेनिस स्पर्धेत अमेरिकेच्या विलीयम्स भगिनीमध्ये सामना होणार आहे. कोरोना महामारीनंतर तब्बल पाच महिन्यांच्या कालावधीने डब्ल्यूटीए टूरवरील ही तिसरी स्पर्धा खेळविली जात आहे.
या स्पर्धेतील पहिल्या फेरीच्या सामन्यात टॉप सीडेड सेरेना विलीयम्सने पेराचा 4-6, 6-4, 6-1 असा पराभव करत दुसऱया फेरीत स्थान मिळविले. पहिल्या फेरीतील अन्य एका सामन्यात सेरेनाची मोठी बहीण व्हिनसने बेलारूसच्या माजी टॉप सीडेड अझारेंकाचे आव्हान 6-3, 6-2 असे संपुष्टात आणले. आता या स्पर्धेच्या दुसऱया फेरीत सेरेना आणि व्हिनस आमने-सामने खेळणार आहेत. हा सामना व्हिनसने 80 मिनिटांच्या कालावधीत जिंकला. पहिल्या फेरीतील अन्य सामन्यात कॅनडाच्या फर्नांडीजने स्टीफन्सचा, कझाकस्तानच्या पुतिनसेव्हाने ऑस्ट्रेलियाच्या टॉमलेजोनोव्हिकचा तर कोको गॉफने डुलहेडीचा पराभव करत दुसरी फेरी गाठली.