वृत्तसंस्था / बार्सिलोना
ला लीगा फुटबॉल स्पर्धेत खेळणाऱया बलाढय़ बार्सिलोना फुटबॉल क्लबच्या एका फुटबॉलपटूला कोरोनाची बाधा झाल्याचे सदर क्लबच्या व्यवस्थापकाने सांगितले.
ला लीगा फुटबॉल स्पर्धेसाठी सरावात दाखल होणाऱया बार्सिलोनाच्या एका फुटबॉलपटूची कोरोना चांचणी घेण्यात आली आणि या चांचणीत तो पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले. कोरोना बाधित बार्सिलोनाच्या या फुटबॉलपटूला त्याच्या स्वत:च्या निवासस्थानी आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले आहे.