उपचारासाठी लोक जमवत आहेत पैसे
रवांडा या आफ्रिकन देशात एका महिलेने ‘दुर्लभ’ मुलाला जन्म दिला आहे. मुलाच्या जन्माच्या काही काळातच पित्याने मुलाला ‘सैतानाचे मूल’ म्हणत त्याच्या आईला सोडून दिले आहे. तेव्हापासून संबंधित महिला स्वतःच्या मुलाची एकटय़ाने देखभाल करत आहे. मुलावरून गावाती लोक महिलेची थट्टा उडवत तिला टोमणे द्यायचे. अशा स्थितीत मुलाच्या उपचारासाठी एक मोहीम चालविली जात आहे.
रवांडाच्या एका गावात एक मुलगा दुर्लभ आजारामुळे अत्यंत वेगळे स्वरुप धारण करून आहे. या मुलाचा चेहरा अजब आणि भीतीदायक वाटतो. यामुळे मुलाच्या पित्याने मुलाला आणि त्याची आई बाजेनेजा लिबर्टा यांना वाऱयावर सोडले आहे. तेव्हापासून लिबर्टा एकटय़ानेच मुलाची देखभाल करत आहेत.
पण आता या मुलाच्या मदतीसाठी सोशल मीडियावर अनेक ठिकाणी मोहीम चालविली जात आहे. आतापर्यंत लाखो रुपये जमा करण्यात आले आहेत. एक गोफंडमी पेजत यार करण्यात आले असून ते लिबर्टा आणि त्यांच्या मुलाला विदेशात उपचारासाठी पाठविण्याच्या उद्देशाने निधी जमवत आहे.
आतापर्यंत 58 लाखांहू अधिक रकमेचा निधी जमविण्यात आला आहे. लोकांच्या प्रार्थनामुळे या मुलाला लवकरात लवकर उपचार मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दुर्लभ आजारामुळे हा मुलाला अत्यंत त्रास हो त असतो. तर काही लोक मुलाला आणि पत्नीला संकटात सोडून जाणाऱया व्यक्तीवर सोशल मीडियातून टीकेची झोड उठविण्यात आली आहे.