वॉशिंग्टन
भारत आणि चीन यांनी लडाख सीमेवर तणाव कमी करण्याचे प्रयत्न चालविले असून ते स्वागतार्ह आहेत, अशी प्रतिक्रिया अमेरिकेने व्यक्त केली आहे. दोन्ही देशांमध्ये तणाव निर्माण होऊ नये, यासाठी दोन्ही देशांनी चर्चेचा मार्ग अनुसरावा, अशी अमेरिकेची इच्छा असून आमचे सीमेवरील परिस्थितीवर बारकाईने लक्ष आहे, असेही अमेरिकेने स्पष्ट केले. हीच शांतता प्रक्रि या पुढे चालू राहील अशी अपेक्षाही अमेरिकेने व्यक्त केली. चीनने आपल्या आक्रमक विस्तारवादाला आवर घातलाच पाहिजे अशी प्रतिक्रिया रिपब्लिकन पक्षाचे सिनेटमधील नेते मायकेल मॅकॉल यांनी व्यक्त केली. तिला बहुसंख्य डेमॉपेटिक सदस्यांनीही पाठिंबा दिला आहे.