वृत्तसंस्था/ अल रेयान
जर्मनीच्या बायर्न म्युनिच संघाने कतारमध्ये गुरुवारी झालेल्या क्लबस्तरीय विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेचे अजिंक्मयपद पटकाविले. या स्पर्धेतील अंतिम सामन्यात बायर्न म्युनिचने मेक्सिकोच्या टायगर्स संघाचा 1-0 अशा गोलफरकाने पराभव केला.
जर्मनी फुटबॉल क्षेत्रामध्ये अव्वल समजल्या जाणाऱया बायर्न म्युनिच क्लबने गेल्या वर्षभराच्या कालावधीत विविध स्तरावरील सहा फुटबॉल स्पर्धा जिंकल्या आहेत. गुरुवारी झालेल्या अंतिम सामन्यात बायर्न म्युनिच संघातर्फे एकमेव निर्णायक गोल बेंजामीन पॅव्हर्डने नोंदविला. चॅम्पियन्स लिग विजेत्या बायर्न म्युनिच संघाने सलग 8 व्या वषी या स्पर्धेत आपला सहभाग दर्शवून अखेर अजिंक्मयपद पटकाविले. हॅन्सी फ्लिक यांच्या बायर्न म्युनिच संघाने यापूर्वी चॅम्पियन्स लिग स्पर्धा, बुंदेस्लीगा स्पर्धा, जर्मन चषक स्पर्धा, युफा सुपरचषक स्पर्धा आणि जर्मन सुपरचषक स्पर्धा जिंकल्या आहेत.