नवी दिल्ली
ट्रक्टरच्या क्षेत्रात आघाडीवरची कंपनी सोनालिका यांनी आपला वॉरंटी कालावधी वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. आता ग्राहकांना 2 महिन्यांचा वाढीव वॉरंटीचा फायदा उठवता येणार आहे. ज्यांची वॉरंटी 1 मे 2021 ते 30 जून 2021 च्या काळात संपणार आहे त्यांना याचा लाभ होणार आहे. 1 मे 2019 ते 30 जून 2019 या कालावधीत ट्रक्टर खरेदी केलेल्या ग्राहकांना वॉरंटीचा लाभ होईल. कृषी क्षेत्रात वापर करणाऱया तमाम सोनालिका ट्रक्टर्सच्या ग्राहकांना वाढीव वॉरंटी उपयुक्त ठरणार असल्याचे कंपनीने म्हटले आहे.