1 डिसेंबरला जत्रोत्सव
वार्ताहर / न्हावेली:
सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली येथील प्रसिद्ध श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव 1 डिसेंबर रोजी साजरा होणार आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी श्री देवी माऊली जत्रोत्सव हा सोनुर्ली व मळगाव या दोन्ही गावांतर्फे रितीरिवाजाप्रमाणे केवळ गावमर्यादित स्वरुपात होणार आहे. भाविकांनी नोंद घ्यावी तसेच जत्रोत्सवासाठी व्यापारी वर्गाने दुकाने, हॉटेल आणू नयेत. गाडय़ा पार्किंगची व्यवस्था केली जाणार नाही, याची नोंद घ्यावी, असे आवाहन देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती सोनुर्ली अध्यक्ष व सचिव यांच्यामार्फत करण्यात आले आहे.