पोलीस स्थानकावर उभ्या करण्यात आलेल्या कारच्या चोरीचा डाव फसला
प्रतिनिधी/ बेळगाव
सोने चोरी प्रकरणाला दिवसेंदिवस खळबळजनक वळण लागत चालले आहे. एकीकडे गृहखात्याने हे प्रकरण गांभीर्याने घेऊन सीआयडीकडे चौकशी सोपविलेली असतानाच दुसरीकडे या प्रकरणात सहभागी असलेले वरि÷ पोलीस अधिकारी व त्यांचे दलाल प्रकरण मिटविण्यासाठी सक्रिय झाले आहेत. चोरी प्रकरणाचा आळ पोलीस उपनिरीक्षकावर घालण्यासाठी पोलीस स्थानकाबाहेर उभी असलेली कार चोरण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे.
सोने चोरी प्रकरण उघडकीस आल्यानंतर सरकारने चार अधिकाऱयांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. यामध्ये यमकनमर्डीचे पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील यांचाही समावेश आहे. मात्र, उपलब्ध माहितीनुसार केवळ वरि÷ अधिकाऱयांनी दिलेल्या सूचनांचे पालन करणाऱया रमेश पाटील यांनाच चोर ठरविण्यासाठी या प्रकरणातील दलाल व पोलीस अधिकाऱयांनी प्रयत्न केले आहेत.
28 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री यमकनमर्डी पोलीस स्थानकाबाहेर उभी करण्यात आलेली कार चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. यासाठी या प्रकरणात दलालाची भूमिका वठविणाऱया हुबळी येथील किरणने मंगळूर येथील कारमालकांना बोलावून घेतले होते. स्वतः गोकाकचे पोलीस उपअधीक्षक जावेद इनामदार यांना सोबत घेऊन मध्यरात्री पोलीस स्थानकात जाऊन मोठा प्रताप गाजविण्याचा प्रयत्न झाला आहे.
चौकशीत उघडकीस आलेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशानुसार कार संबंधितांना ताब्यात देण्याआधीच त्या कारमधील 4 किलो 900 ग्रॅम सोने चोरण्यात आले होते. चोरीचा आळ पोलीस उपनिरीक्षकावर घालण्यासाठी चक्क कार चोरण्याचा प्रयत्न झाला आहे. त्यासाठी बनावट चावीचा वापर करण्यात आला आहे. ही संपूर्ण माहिती तपासात उघडकीस आली असून सोने हडपण्यासाठी आपल्याच पोलीस दलातील कनि÷ अधिकाऱयाला चोर ठरविण्याचा प्रयत्न झाला आहे.
‘तरुण भारत’ला उपलब्ध झालेल्या माहितीनुसार न्यायालयाच्या आदेशाआधीच पोलीस स्थानकाबाहेरून जर कार पळविली तर संपूर्ण प्रकरणाचा ठपका यमकनमर्डी पोलिसांवर येतो. त्यामुळे अत्यंत सहजपणे यातून बाहेर पडू शकतो, असा विचार करून मंगळूर येथील संबंधितांना घेऊन किरण 28 फेब्रुवारीच्या मध्यरात्री 12 वाजता यमकनमर्डी पोलीस स्थानकात पोहोचतो. यासाठी पोलीस उपअधीक्षकाचीही मदत घेण्यात येते.
पोलीस स्थानकात पोहोचल्यानंतर तेथील सर्व पोलिसांना आपल्या वाहनात बसवून महामार्गावर तुम्ही वाहनांची तपासणी करा, असा आदेश पोलीस उपअधीक्षक देतात. वरि÷ांच्या आदेशावरून बहुतेक पोलीस महामार्गावर पोहोचतात. पोलीस स्थानकात केवळ एका पोलिसाला ठेवण्यात येते. हीच संधी साधून बनावट चावीचा वापर करून अर्टिगा कार पळविण्याचा प्रयत्न होतो. मात्र, चावी बदलल्यामुळे कारचा जोरात आवाज येतो. आवाज येताच पोलीस स्थानकात असलेला एक पोलीस धावत बाहेर पडतो. ते पाहून किरण व त्याचे साथीदार तेथून पळ काढतात. त्यामुळेच चोरीचा प्रयत्न फसतो.
जर त्याच दिवशी मध्यरात्री कार चोरण्यात ही टोळी यशस्वी झाली असती तर त्याची संपूर्ण जबाबदारी पोलीस उपनिरीक्षकावर आली असती. पोलीस दलातील एका वरि÷ अधिकाऱयाच्या मदतीने किरणने चोरीचा डाव आखला होता, अशी धक्कादायक माहिती उघडकीस आली असून सीआयडीच्या अधिकाऱयांनी या दिशेने तपासाची चपे फिरविली आहेत. सध्या सरकारने पोलीस उपनिरीक्षक रमेश पाटील व हुक्केरीचे तत्कालिन पोलीस निरीक्षक गुरुराज कल्याणशेट्टी यांची बदली केली असली तरी प्राथमिक चौकशीत त्यांचा या प्रकरणात कितपत सहभाग आहे, याची पडताळणी करण्यात येत आहे. या प्रकरणाला दिवसेंदिवस कलाटणी मिळत चालली असून सीआयडीची चौकशी कुठेपर्यंत जाऊन पोहोचणार, याकडे साऱयांचे लक्ष लागून राहिले आहे.