वार्ताहर/ किणये
गावातील तरुणाला कोरोनाची लागण झाली असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. सदर तरुण हा मुंबईहून आपल्या मूळ गावी परतला होता. कोरोनाचा रुग्ण सापडला असल्याने सोनोली गावात बाळेकुंद्री प्राथमिक आरोग्य केंद्राच्यावतीने जनजागृती करण्यात येत आहे. हा तरुण मुंबई येथून मामा समवेत मणगुत्ती या गावी आला होता. तेथे तो क्वारंटाईन मध्ये होता. त्यानंतर तो आपल्या सोनोली गावाला येऊन कुटुंबासमवेत राहत होता. त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आल्यामुळे रविवारी त्याला सरकारी इस्पितळात उपचारासाठी नेण्यात आले आहे.
त्याच्या कुटुंबातील पाच व शेजारील तिघाजणांना अशा एकूण आठ जणांना गावातील शाळांमध्ये क्वारंटाईन करण्यात आले आहे. या आठ जणांचे स्वॅब तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापूर्वी मुंबई, चिपळून येथून आलेल्या तिघा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे गावात सध्या 11 जण क्वारंटाईनमध्ये आहेत.
बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्राम पंचायत यांच्यावतीने गावात जनजागृतीची मोहिम राबविण्यात येत आहे. मंगळवारी सोनोलीतील शाळांमध्ये सॅनिटायझर फवारणी करण्यात आली.
गावात कोणाला सर्दी, खोकला, ताप आहे का याची तपासणीही करण्यात येत आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरु आहेत. बेळगुंदी प्राथमिक आरोग्य केंद्राचे अधिकारी डॉक्टर विनय हल्लिकेरी, आरोग्य सुपरवायझर एस. एस. कुलकर्णी, एस. बी. पाटील, आशा कार्यकर्त्या लक्ष्मी झंगरुचे, बेबी पाटील, अंगणवाडी शिक्षिका सुधा बोकडे बेबी सुतार राजश्री तरले आदींसह ग्राम पंचायत सदस्य व ग्रामपंचायत कर्मचारी या महिमेसाठी विशेस खबरदारी घेताना दिस आहेत.