ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिह्यातील सोपोर भागात नगरपालिकेच्या कार्यालयावर आज दुपारी दहशवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात ब्लॉक डेव्हलपमेंट कौऊंन्सिलचा (बीडीसी) एक सदस्य आणि त्यांचा खासगी सुरक्षा रक्षक ठार झाला आहे. तर एकजण जखमी झाला आहे.
रियाझ अहमद असे मृत्यू झालेल्या बीडीसी सदस्याचे नाव आहे. तर शफाद अहमद असे त्यांच्या मृत सुरक्षा रक्षकाचे नाव आहे. जम्मू-काश्मीर पोलिसांनी सोपोर परिसराला घेराव घातला असून, शोधमोहिम सुरू आहे.