प्रतिनिधी / सातारा :
सध्या शेतीपिकांची लागवड करण्याकरीता आधुनिकतेची जोड आली आहे. शेतकरीवर्ग शेतीचे उत्पादन घेताना सोईस्कर व्हावे या उद्देशाने विविध तंत्रज्ञानाचा वापर करतात. त्यातच आता खरीप हंगामातील पेरणी सुरू असुन, यंदा सोयाबीन उत्पादनाला चांगला दर मिळाल्याने कित्तेक शेतकऱ्यांनी दर चांगला मिळत असल्याने सोयाबीनचे उत्पादन घेण्याचे ठरविले आहे. आता याच्या पेरणी करीता ‘डिब्लर’ हे मशीन शेतकऱ्यांना चांगलीच साथ देत आहे.
सोयाबीन पेरणी रूंद-तरी-गादी-वाफा या पध्दतीने लावगडीकरीता या डिब्लरचा वापर होतो. याच्यामाध्यमातुन वाण एकाच वेळी पेरूही शकता व खतही घालण्यात येते. यामुळे शेतकऱ्यांचा पेरणीसाठीचा वेळ आणि मेहनत दोन्ही ही वाचु शकणार आहे. तसेच या मशिनचा वापर करण्यासाठी कोणत्याही इंधनाची गरज लागत नाही. त्यामुळे अत्यंत अल्प खर्चात शेतकऱ्यांना सोयाबिनच्या पिकाचे उत्पादन घेता येणार आहे.
डिब्लर या मशिनीमध्ये एकाबाजुने वाण तर दुसऱ्या बाजुने खत घालुन ते जमीनीवर ठेऊन अलगत दाबायचे आहे. एकच व्यक्तीची गरज या मशीनचा वापर करताना लागत आहे. याचा वापर करताना वाण ही कमी लागणार आहे, आणि शेतकऱ्यांच्या उत्पन्नात ही वाढ होणार आहे. तसेच शेतकऱ्यांची मजुरीही वाचणार आहे. वाई सारख्या भागातील शेतकऱ्यांनी याचा वापर करण्यास सुरूवात ही केली आहे. अठराशे पासुन ते तीन हजार रूपयांपर्यंत हे डिब्लर मशिन बाजारपेठेत उपलब्ध आहे. कृषी विभागाच्या अधिकारी वर्गांनीही हे शेतकऱ्यांसाठी फायदेशीर असल्याचे सांगितले आहे.
दिवसात 3 ते 4 एकर पेरणी
जेव्हा शेतकरी नियमीत पेरणी करतो त्याला 27 ते 30 किलो बियाने एकरी लागते. पण या डिब्लर मशीनच्या वापराने केवळ 7 ते 8 किलो बियाने लागते. तसेच टॅक्टरचा 12 शे ते दीड हजार रूपयांपर्यंतचा खर्च वाचणार आहे. याचबरोबर या मशिनच्या वापराने 3 ते 4 एकर बियाणांची पेरणी एका दिवसाला करता येते.