तरुण भारत संवाद, प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने 14 कोरोना बाधित रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये 7 पुरुष, 7 स्त्रियांचा समावेश आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितसंख्या 378 वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी रविवारी दिली.
आज एकूण 242 अहवाल प्राप्त झाले. त्यापैकी 228 जणांचा रिपोर्ट निगेटिव आला तर 14 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला. एकूण 4062 जणांची चाचणी करण्यात आली. त्यापैकी 3684 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. कोरोनाबधितांची संख्या 378 वर गेली आहे. कोरोनामुक्त झालेल्या 150 जणांना घरी सोडण्यात आले आहेत. ही आकडेवारी रविवारी सकाळी 8 वाजेपर्यंत असून उर्वरित माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर सायंकाळी देणार आहेत.