जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापुरात नव्याने ४० कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली आहे. यामध्ये ६३ पुरुष आणि ४ स्त्रियांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोना बाधितांची संख्या १०८० वर पोहचली आहे. उर्वरित व्यक्तींवर सिव्हिल रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी बुधवारी दिली.
आज १५६ जणांचे तपासणी अहवाल प्राप्त झाले. यातील 40 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह तर ११६ जणांचे अहवाल निगेटिव्ह आले. आत्तापर्यंत एकूण ७८६९ जणांचे तपासणी करण्यात आली. यातील ६७८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.तर १०८० अहवाल पॉझिटिव आले आहे. एकूण ९० जणांचा मृत्यू झाला आहे. तर ४४७ रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. ही आकडेवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ची आहे. उर्वरित माहिती जिल्हाधिकारी शंभरकर संध्याकाळी देणार आहेत.