प्रतिनिधी / करमाळा
करमाळा शहरासह तालुक्यात आज एकूण २९० रॅपिड टेस्ट घेण्यात आल्या. यामध्ये ४४ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला असून यात २६ पुरुष तर १८ महिलांचा समावेश आहे. आज करमाळा शहरात १०२ ॲंटिजिन रॅपिड टेस्ट मध्ये १८ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह तर ग्रामीण भागात १८८ रॅपिड टेस्टमध्ये २६ जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
आज ३४ जणांना डिस्चार्ज दिला असून आजपर्यंत ८०३ कोरोनाबाधीत रुग्ण बरे होवून घरी सोडले आहे. सध्या ४६१ जणांवर उपचार सुरु आहेत. आजपर्यंत तालुक्यात एकूण २२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. करमाळा तालुक्यातील आजपर्यंत एकूण कोरोनाबाधितांची संख्या १२८६ वर जावून पोहोचली आहे.
करमाळा शहरातील १८ कोरोनाबाधीत
कानाडगल्ली १ पुरुष, भीमनगर १ महिला ,खडकपुरा १ पुरुष, २ महिला, सावंतगल्ली १ पुरुष, मेनरोड ३ पुरुष, ४ महिला मंगळवार पेठ १ पुरुष, कुंकू गल्ली २ महिला, दगडी रोड १ महिला, सुमंतनगर १ पुरुष
ग्रामीण भागातील २६ कोरोनाबाधीत
राखवाडी २ पुरुष, २ महिला, केम ५ पुरुष, ४ महिला चिखलठाण १ पुरुष, १ महिला, जेऊर ५ पुरुष ,रावगाव १ पुरुष, १ महिला, श्रीदेवीचामाळ १ पुरुष, १ महिलाकुंभेज १ पुरुष, १ महिला