कोरोनाने एकाच बळी
एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या १३३ वर
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार
६४ व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
मृत ११, एकूण बरे ५८
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात नव्याने १६ कोरोना बाधीत रुग्णांची भर पडली तर बाधित रुग्णामध्ये ८ पुरुष, ८ स्त्रियांचा समावेश आहे. आज एकाचा तर आतापर्यंत ११ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे . आज २० तर आतापर्यंत ५८ रुग्ण बरे होऊन घरी गेली आहेत. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण १३३ कोरोनाबधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित ६४ रुग्णांवर उपचार सुरू आहेत अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बी. टी. जमादार यांनी सोमवारी दिली.
मयत व्यक्ती ७७ वर्षीय अक्कलकोट तालुक्यातील करजगी येथील रहिवासी आहे. १३ जून अश्विनी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आणि त्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
पॉझिटिव्ह रुग्णामध्ये चंद्रोदय नगर कुंभारी तालुका दक्षिण सोलापूर १, नवीन विडी घरकुल २, अश्विनी रुग्णालय कुंभारी दोन, करजगी तालुका अक्कलकोट एक, पारधी वस्ती मुळेगाव तांडा ८, भोजप्पा तांडा उत्तर सोलापूर १, बगले बरड बार्शी १ इतके रुग्ण आढळले आहेत. आज ९५ जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील १६ पॉझिटीव्ह तर 79 अहवाल निगेटिव्ह आले. अद्याप 22 अहवाल प्रलंबित आहेत. १३३ रुग्णांपैकी ८१ पुरुष ५२ स्त्री आहेत. तालुक्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. तर ५८ जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट १६, बार्शी २०
माढा ७, माळशिरस ४,
मोहोळ ५, उत्तर सोलापूर १०
सांगोला ३, पंढरपूर ७
दक्षिण सोलापूर ६१
एकूण १३३
होम क्वांरटाईन २१७९
आजपर्यंत तपासणी केलेली व्यक्ती २०३१
प्राप्त अहवाल २००९
प्रलंबित अहवाल २२
एकूण निगेटिव्ह १८७७
कोरोनाबाधितांची संख्या १३३
रुग्णालयात दाखल ६४
आतापर्यंत बरे ५८
मृत ११