प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात आज गुरुवारी 158 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून, यापैकी 94 पुरुष, 64 स्त्रियांचा समावेश आहे. आज 2 तर आतापर्यंत 974 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 32 हजार 686 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 1 हजार 757 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.शितलकुमार जाधव यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोना बाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3166 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 3008 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 158 पॉझिटिव्ह आढळल्या आहे. आतापर्यंत 974 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 29 हजार 955 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 1147
मंगळवेढा- 1469
बार्शी – 5903
माढा- 3403
माळशिरस – 5760
मोहोळ- 1632
उत्तर सोलापूर – 742
करमाळा- 2071
सांगोला – 2530
पंढरपूर 6566
दक्षिण सोलापूर – 1463
एकूण – 32,686
होम क्वांरटाईन – 21611
एकूण तपासणी व्यक्ती- 276882
प्राप्त अहवाल- 27682
प्रलंबित अहवाल- 55
एकूण निगेटिव्ह – 244142
कोरोनाबाधितांची संख्या- 32,686
रुग्णालयात दाखल – 1757
आतापर्यंत बरे – 29, 955
मृत – 974