एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 18, 333 वर
जिल्हा आरोग्य अधिकारी बी.टी. जमादार यांची माहिती
6212व्यक्ती सिव्हिल रुग्णालयात घेत आहेत उपचार
आज 13, एकूण मृत 517, एकूण बरे 11,604
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण, नगरपालिका भागात मंगळवारी 475 कोरोनाबाधित पॉझिटिव्ह रुग्णांची भर पडली असून यापैकी 300 पुरुष, 175 स्त्रियांचा समावेश आहे. आज 13 तर आतापर्यंत 517 जणांचा मृत्यू झाला आहे. जिल्ह्यातील ग्रामीण भागात एकूण 18 हजार 333 कोरोनाबाधित रुग्ण झाले आहेत. उर्वरित 6 हजार 212 रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी जमादार यांनी दिली.
जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने आज कोरोनाबाधितांचा अहवाल दिला आहे. आज 3451 जणांचे अहवाल प्राप्त झाले होते. त्यातील 2976 अहवाल निगेटिव्ह आले आहेत तर 475 पॉझिटिव्ह आढळल्या आहे . 18 हजार 333 रुग्णांपैकी 11 हजार 243 पुरुष, 7 हजार 90 स्त्री आहेत. आतापर्यंत 517 जणांचा मृत्यू झाला आहे. एकूण 11 हजार 604 जण बरे होऊन घरी गेली आहेत.
कोरोनाबाधितांची संख्या पुढील प्रमाणे
अक्कलकोट – 802
मंगळवेढा- 854
बार्शी – 3553
माढा- 1801
माळशिरस – 2521
मोहोळ- 812
उत्तर सोलापूर – 623
करमाळा- 1294
सांगोला – 11045
पंढरपूर 3794
दक्षिण सोलापूर – 1154
एकूण – 18, 333
होम क्वांरटाईन – 6131
एकूण तपासणी व्यक्ती- 143089
प्राप्त अहवाल- 142967
प्रलंबित अहवाल- 122
एकूण निगेटिव्ह – 124634
कोरोनाबाधितांची संख्या- 18, 333
रुग्णालयात दाखल – 6212
आतापर्यंत बरे – 11,604
मृत – 517