प्रतिनिधी / सोलापूर
कौंटुबिक वादातून उत्तर सोलापूर तालुक्यातील डोणगाव येथे पतीने पत्नीवर कुऱ्हाडीने हल्ला केला. ही घटना गुरुवारी सकाळी 9.30 वाजण्याच्या सुमारास घडली. विशेष म्हणजे मुलीचे आई-वडील घराबाहेर बसले होते. तर स्वत:च्या आईवडीलांना घराबाहेर काढून तरुणाने हल्ला केल्याची चर्चा गावात होती. हल्ल्यानंतर कgऱहाड हातात घेऊन स्वत:हून तो पोलीस ठाण्यात हजर झाला.
धानव्वा गणेश बंडगर (वय 20, रा. डोणगाव ता. उत्तर सोलाापूर) अशी जखमी झालेल्या विवाहितेचे नाव आहे. तर गणेश रमेश बंडगर (वय 27, रा. डोणगाव, ता. उत्तर सोलापूर) असे पतीचे नाव आहे.