महाविकास आघाडीसह भाजपमध्येही बंडखोरी
तरुण भारत संवाद प्रतिनिधी / पंढरपूर
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून समाधान आवताडे तर राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके यांनी आपली उमेदवारी अर्ज मंगळवारी दाखल केले. या मतदारसंघांमध्ये महाविकासआघाडीतील स्वाभिमानी, शिवसेना यांचे आणि भाजपाचे असे ४ बंडखोर उमेदवार मैदानात आहेत. पोटनिवडणुकीसाठी ३८ उमेदवारांनी ४४ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीसाठी मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटची मुदत होती. यामध्ये शेवटच्या दिवशी ३० उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये आत्तापर्यंत या पोटनिवडणुकीसाठी ३८ उमेदवारांनी ४४ अर्ज दाखल आहेत. यामध्ये मतदार संघशिवाय सातारा इंदापूर सोलापूर पुणे येथील उमेदवाराने देखील आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत..
मंगळवारी सकाळी साडेअकराच्या दरम्यान भाजपाचे समाधान अवताडे आणि आमदार प्रशांत परिचारक यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. याशिवाय पूरक अर्ज दाखल करण्यासाठी अवताडे यांच्यासोबत माजी मंत्री राम शिंदे आमदार रणजितसिंह मोहिते पाटील आमदार विजयकुमार देशमुख उपस्थित होते. तर साधारण साडेबारा वाजण्याच्या सुमारास राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भारत भालके यांनी काँग्रेसचे आमदार प्रणिती शिंदे आणि शिवसेनेचे जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अवताडे आणि भालके यांच्याशिवाय साताऱ्याचे बिग बॉस फेम अभिजित बिचुकले यांनी आपली उमेदवारी दाखल केली. तर समाधान आवताडे यांचे चुलत बंधू सिद्धेश्वर आवताडे परिचारक यांचे निवंत नागेश भोसले यांनीही आपले उमेदवारी अर्ज दाखल करत बंडाचे निशाण काढले आहे. स्वाभिमानीच्या सचिन पाटील यांनी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा एबी फॉर्म दाखल केला. आणि महा विकास आघाडी विरुद्ध बंडखोरी केली. यापूर्वीच शिवसेनेच्या महिला जिल्हाप्रमुख शैला गोडसे यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याशिवाय धनगर समाजाच्या वतीने स्वतंत्रपणे माऊली हळणवर यांची उमेदवारी दाखल करण्यात आली.
स्व. आ. भारत भालके यांचा पोशाख परिधान करून भगिरथ यांनी भरला उमेदवारी अर्ज भाजप आणि राष्ट्रवादी दोघांचेही कार्यकर्ता मेळाव्यातून शक्तिप्रदर्शन : पण कोरोनाचे नियम धाब्यावर प्रशासन आणि पोलिसां विरुद्ध तोंडसुख घेत अभिजीत बिचकुले यांनी भरला उमेदवारी अर्ज नगराध्यक्षा साधना भोसले भाजपच्या व्यासपीठावर तर त्यांचे पती नागेश भोसलेंची भाजप विरुद्ध बंडखोरी |