तरुण भारत संवाद प्रतिनिधी / करमाळा
दिल्ली येथे मराठा क्रांती मोर्चाचे करमाळा येथील राज्य समन्वयक महेश डोंगरे यांनी केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने पुढाकार घेण्याची मागणी केली.
मराठा समाजाचे राज्य समन्वयक डोंगरे यांनी खास दिल्ली येथे जाऊन मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासंदर्भात केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांची भेट घेऊन मराठा आरक्षण वाचवण्याची जबाबदारी जेवढी राज्य सरकारची आहे तेवढीच केंद्र सरकारची पण आहे याची जाणीव केंद्रीय मंत्र्यांना करून दिली. त्यासाठी आपण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या कामी लक्ष घालण्यासाठी विनंती करण्यात यावी अशी विनंती केली. पंतप्रधान यांनी लक्ष घातल्याशिवाय हा प्रश्न सुटणार नाही, याची जाणीव गडकरी यांना करून दिली.
यावेळी गडकरी यांनी शंभर टक्के मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करतो व लक्ष घालतो असे आश्वासन मराठी क्रांती मोर्चा राज्य समन्वयक डोंगरे यांना दिले.