तरुण भारत संवाद प्रतिनिधी / अक्कलकोट
अक्कलकोट तालुक्यातील कुरनुरचे भूमिपुत्र व मोहोळचे माजी आमदार तथा माजी मंत्री प्रा लक्ष्मण ढोबळे यांच्या पत्नी अनुराधा लक्ष्मण ढोबळे यांचे हृदय विकाराच्या तीव्र झटक्याने पुणे येथील रुग्णालयात आज (दि. ४ मे) रोजी पहाटे निधन झाले. त्या ५८ वर्षाच्या होत्या.
‘सावली’ वुमेन्स फाउंडेशनच्या त्या अध्यक्षा होत्या. त्यांच्या पश्चात पती माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, मुलगा अभिजीत ढोबळे, सून शारोन ढोबळे, दोन मुली क्रांती आवळे व कोमल साळुंखे तसेच जावई अब्राहम आवळे, अजय साळुंखे व नातवंडे असा मोठा परिवार आहे. त्या मनमिळाऊ व प्रेमळ स्वभावाच्या होत्या. त्यांच्या जाण्याने शाहू परिवार व महात्मा फुले सूतगिरणी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.